📚 फ्युचर फाउंडेशन – मोफत वह्या वाटप उपक्रम ✨
दिनांक : २२ सप्टेंबर २०२६
आज विद्यामंदिर, मासेवाडी (ता. आजरा, जि. कोल्हापूर) येथील जिल्हा परिषद शाळेत फ्युचर फाउंडेशनच्या वतीने गरीब व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
या उपक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक श्री. रवींद्र हरी पाटील तसेच सर्व शिक्षकवृंद यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या या सामाजिक उपक्रमाबद्दल शिक्षक व विद्यार्थ्यांनी फ्युचर फाउंडेशनचे मनःपूर्वक आभार मानले.
शिक्षण हीच खरी समाजपरिवर्तनाची ताकद!
#FutureFoundation #NotebookDistribution #EducationForAll #Ajara #Kolhapur